Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला फिरत्या पथकाची कारवाई आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 06 फेब्रुवारी 2025) -...
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला
फिरत्या पथकाची कारवाई
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 06 फेब्रुवारी 2025) -
        महाराष्ट्रात पर्यावरणाचे कारण सामोरे करत रेती घाट लिलाव न झाल्याने रेती चोरीच्या घटना सातत्याने घटत आहे. तस्कर ट्रॅक्टर व हायवा ट्रकच्या मदतीने रात्री नदी नाल्यावरून रेती चोरून नेतात व त्याची बेभाव विक्री करतात. दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी एक ट्रक रेती चोरून नेत असल्याची माहिती कोरपना तहसील कार्यालयातील फिरत्या पथकाला मिळाली. पहाटे 1.30 वाजताच्या दरम्यान फिरतेपथक प्रमुख महसूल मंडळ अधिकारी रमेश मेश्राम, नांदा महसूल ग्राम अधिकारी नेताम, साजा दुर्गाडी राजिने साजा, उपरवाही राऊत साजा, हिरापूर यांनी सापळा रचुन हायवा ट्रक MH-34 BZ-0717 पकडून ट्रकची तपासणी केली असता यामध्ये अंदाजे 10 ब्रास अवैध रेती आढळून आली यावरून वाहन चालक दत्तू सुरेश चेनुरवार वय 33 रा. चंदनवाही, वाहन मालक शाहरुख पठाण रा. गडचांदूर यांचे विरुद्ध कारवाई करून पोलीस निरीक्षककांच्या मदतीने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला. सदरची कारवाई काश्मिरा संखे भा.प्र.से. परिविक्षाधीन अधिकारी तहसीलदार कोरपना यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #retighatauction #sandsmuggling #tractor #hiwa #tahasilofficekorpana #revenueboardofficer #policestationgadchandur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top