प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्थेने दिले मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे
आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले, प्रतिनिधी
राजुरा (दि. 05 जानेवारी 2025) -
प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्थेने राजुरा येथे (girls government hostel) मुलींच्या शासकीय वस्तीगृहात दहा दिवसाचे कराटे प्रशिक्षण आयोजन केले होते (Karate training). या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम (Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात मुलींना सक्षमीकरण आणि संकटसमयी आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये हे देखील सांगितले गेले की, मुलींनी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे यांनी आत्मसंरक्षणाचे धडे देत या दहा दिवसांच्या प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांना प्रेमांजलीच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. (premanjali mahila bahuuddeshiya sanstha)
कार्यक्रमाचे उद्घाटन गृहपाल जे.रा. गाजलीवार यांनी केले, तर अध्यक्षस्थानी प्रेमांजलीच्या संचालिका चित्रलेखा धंदरे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.भावना रागीट, गीता घरत, राखी बोढे, मीना डांगे, आणि चंदा ओजा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वस्तीगृहातील विद्यार्थिनीने सुंदर रचनांद्वारे केले. या उपक्रमामुळे मुलींच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल आणि भविष्यकाळातील सक्षम सावित्री घडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
#premanjalimahilabahuuddeshiyasanstha #girlsgovernmenthostel #Karatetraining #KrantiJyotiSavitribaiPhuleJayanti #Karatecoach #PrakashPachare #maharashtra #vidarbha #aamchavidarbha #nagpur #chandrapur #rajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.