Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पहिल्याच प्रयत्नात राम झंवर चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षा उत्तीर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पहिल्याच प्रयत्नात राम झंवर चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षा उत्तीर्ण ॲड. वामनराव चटप यांनी केला राम शंकर झंवर व निरज रमेश रासेकर यांचा सत्कार आमचा...
पहिल्याच प्रयत्नात राम झंवर चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षा उत्तीर्ण
ॲड. वामनराव चटप यांनी केला राम शंकर झंवर व निरज रमेश रासेकर यांचा सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 05 जानेवारी 2025) -
       राजुरा येथील (Ram Shankar Zanwar) राम शंकर झंवर या विद्यार्थ्याने (Chartered Accountant Examination) चार्टर्ड अकाऊंटंट ची परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली (Passed the exam in the first attempt). या यशाबद्दल माजी आमदार ॲड. वामनराव चटप (Ex MLA Adv. Vamanrao Chatap) यांनी त्यांचे घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राजेंद्रजी झंवर, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, ॲड.दिपक चटप, बाजार समिती संचालक दिलीप देठे व प्रभाकर ढवस, बंडू देठे, कपील इद्दे, माजी नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, पुंडलिक वाढई, नरेंद्र मोहारे, खुशाल अडवे, सौरभ मादासवार, नवल झंवर, दिपक झंवर, राहूल झंवर, सरिता झंवर इत्यादी उपस्थित होते.

       देशपांडे वाडी येथील (Niraj Ramesh Rasekar) निरज रमेश रासेकर यांचेही चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल (shetkari sanghtna) शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बळीराम खुजे, रमेश रासेकर, लता रासेकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#RamShankarZanwar #NirajRameshRasekar #CharteredAccountantExamination #Passedtheexaminthefirstattempt #ExMLA #advwamanraochatap #shetkarisanghtna #maharashtra #vidarbha #aamchavidarbha #nagpur #chandrapur #rajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top