Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदर्श सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदर्श सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते उद्घाटन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 05 जानेवारी 2025) - ...
आदर्श सहकारी पतसंस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष
आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते उद्घाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 05 जानेवारी 2025) -
        राजुरा शहरातील (aadarsha sahkari patsanstha) आदर्श सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त (Silver Jubilee Year) दिनांक 03 जानेवारीला आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार देवराव भोंगळे (MLA Devrao Bhongle) यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मिलिंद देशकर होते (Milind Deshkar). यावेळी श्रीमती मालती देशकर, उपाध्यक्ष सुभाष रामगिरवार, संचालक प्रशांत घरोटे, मारुती गव्हाणे, प्रकाश बेजंकीवार, सुरेंद्र जुल्मे, संचालिका सीमा देशकर, आशा शर्मा, माणिक उपलंचीवार, नीलमणी दाचेवार, रौप्य महोत्सव समिती सदस्य संजय गडकरी, छोटूलाल सोमलकर, एड.रजनी बोढे, चित्रलेखा धंदरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सुरेश रागीट, सुधाकर देशमुख, सचिन भोयर, पुनम शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. 

       कार्यक्रमात बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, स्व. राघवेंद्रराव देशकर यांनी अंत्यंत विपरित परिस्थितीत पुढाकार घेऊन या संस्थेची स्थापना केली. या 25 वर्षात संस्थेने प्रशंसनीय प्रगती केली आहे. या रौप्यमहोत्सवी निमित्ताने संस्थेने अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ही अभिनंदनीय बाब असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

        यावेळी अंगणवाडी केंद्र क्रमांक 64 राजुरा येथील (Malnourished children) दोन कुपोषित बालकांना आमदार देवराव भोंगळे आणि संस्थाध्यक्ष मिलिंद देशकर यांच्या हस्ते (Nutritional diet) पोषण आहाराच्या दोन किट देण्यात आल्या. याप्रसंगी (Anganwadi) अंगणवाडी शिक्षिका श्रीमती दर्शना रागीट यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक सागर राचर्लावार (Sagar Racharlawar) यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक एड. प्रशांत घरोटे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व अभिकर्ता, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

#aadarshasahkaripatsanstha #SilverJubileeYear #MLADevraoBhongle #MilindDeshkar #Malnourishedchildren #Nutritionaldiet #Anganwadi #SagarRacharlawar

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top