नॅशनल कराटे स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - अशोक राव
राजुरा (दि. ०९ डिसेंबर २०२४) -
विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे, हे खरे आहे. आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण फक्त शारीरिक कौशल्य वाढवण्यासाठीच नाही, तर व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास वाढवणे आणि असुरक्षिततेच्या परिस्थितींमध्ये सुरक्षित राहण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते २७ व्या नेशनल कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अरुण धोटे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि समर्पणाची प्रशंसा झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतल्यास, इतर विद्यार्थीही आत्मसंरक्षण आणि कराटे यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, आत्मसंरक्षणाच्या या कौशल्यांचा अभ्यास करणे आणि त्याचा वापर करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, असेही अरुण धोटे म्हणाले. (Students felicitated in National Karate Competition)
पुणे बालेवाडी येथे ओकिनावा मार्शल आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत २७वी ओकिनावा मार्शल आर्ट नेशनल चामपियनशिप मध्ये प्रशिक्षक प्रकाश पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ओकिनावा मार्शल आर्ट्स स्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सुयश संपादन करून शहरांचे नांव उंचावले. यामध्ये सुवर्ण पदक विजेते प्रथमेश पचारे (२०), ओम चुंबले (१५), तक्षु कडूकर, रजत पदक विजेते कु. वेदांती रागीट, सुरेखा अलोने, कास्य पदक विजेते प्रगती जेनेकर, तनवी रामटेके, आराध्या चांदेकर या सर्व विजयी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पुष्पहार, शाल देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक प्रकाश पचारे, संतोष गटलेवार, तलाठी सुनील रामटेके, देवराव रागीट, राजेंद्र जेणेकर, संतोष मेश्राम, अशोक राव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Students should take self defense lessons - Arun Dhote)
#Karate #OkinawaMartialArtsandKarateShotokaiIndia #SelfDefenseTraining #Personalitydevelopment #confidencebuilding #stayingsafeinsituationsofvulnerability #FormerMayor #ArunDhote #Pune #Rajura #rajura #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #27thOkinawaMartialArtsNationalChampionship #OkinawaMartialArtsSchoolRajura
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.