Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दर दोन महिन्यांनी तब्बल १० दिवसांचा रेल्वे ब्लॉक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दर दोन महिन्यांनी तब्बल १० दिवसांचा रेल्वे ब्लॉक विरुर स्टेशन परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स...
दर दोन महिन्यांनी तब्बल १० दिवसांचा रेल्वे ब्लॉक
विरुर स्टेशन परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
विरुर स्टेशन (दि. ०८ डिसेंबर २०२४) -
       विरूर रेल्वे गेट परिसरात दर दोन महिन्यांनी रेल्वे कामांसाठी ४ दिवसांचा ब्लॉक घेतला जातो. मात्र, अलीकडेच या ब्लॉकचा कालावधी वाढवून १० दिवस केला जात असल्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागणार आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांपासून ते रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. 

        ब्लॉक दरम्यान पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था दक्षिण मध्य रेल्वे कडून करण्यात आलेली नाही. नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांनाही आपले शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणी येत आहेत. प्रत्येक वेळी ब्लॉक जाहीर होतो, पण पर्यायी व्यवस्था का केली जात नाही. असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. 

        ब्लॉकच्या काळात रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा सामना करताना अडचणी येत आहेत. नागरिकांच्या मते काम आवश्यक आहे मात्र त्यासाठी पर्यायी रस्ते तयार करणे हे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे. हे दुर्लक्ष रेल्वे विभागाकडून केल्या जाणे हे गंभीर आहे, असे विरुर परिसरातील स्थानिक नागरिकाने सांगितले.

        रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कामाची गती वाढवण्यासाठी ब्लॉकचा कालावधी वाढवला जातो. मात्र, नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी पुढील काळात पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

        नवनिर्वाचित आमदार देवरावदादा भोंगळे यांनी या समस्येवर लक्ष देऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाला तातडीने उपाययोजना करण्यास पाठपुरावा करून तोडगा काढतील अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

        नागरिकांना आता या समस्येवर त्वरित तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने आणि स्थानिक प्रतिनिधींनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

#10daysrailwayblock #Railway #WirurStation #citizens #Patients #hospital #trouble #SouthCentralRailway #RailwayDivision #School #children #seniorcitizens #women #NewlyelectedMLA #MLA #DevravadaBhongle




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top