Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस व एलटीटी मुंबई एक्स्प्रेस दररोज चालवा - गणेश सैदाने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस व एलटीटी मुंबई एक्स्प्रेस दररोज चालवा - गणेश सैदाने आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. १३ डिसेंबर २...
काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस व एलटीटी मुंबई एक्स्प्रेस दररोज चालवा - गणेश सैदाने
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. १३ डिसेंबर २०२४) -
      नागपूर येथे 11 डिसेंबर रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या 164 व्या बैठकीत बल्लारपूरचे डीआरयूसीसी समितीचे सदस्य गणेश सैंदाणे यांनी आठवड्यातून एकदा धावणारी काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस व एलटीटी मुंबई एक्स्प्रेस दररोज सुरु करण्याची मागणी केली. या मागणीला बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.

        या बैठकीत उपस्थित वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी उपस्थित सर्व सदस्यांच्या मागण्या ऐकल्या आणि सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे सुविधा वाढवण्यासाठी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे कौतुक केले. यावेळी सैंदाणे यांनी प्रवाशांच्या अडचणी ओळखून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह स्थानकावरून सकाळी 8.30 वाजता ऐवजी सकाळी 11 वाजता सोडावी व चार स्लीपर कोच वाढवावेत, गाडी क्र. 11121/11122 भुसावळ-वर्धा ते बल्हारशाहा पर्यंत वाढवा व गाड़ी क्र.01316/0135 बल्हारशाह-वर्धा भुसावळपर्यंत वाढवावा आणि बल्हारशाह रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आणि वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणी प्रकाशाची कमतरता याकडे लक्ष द्या अशी मागणी केली. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) पी.एस. खैरकर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (जीएसयू) नवीन पाटील उपस्थित होते.

#KazipethPuneExpress #LTTMumbaiExpress #DivisionalRailwayAdvisoryCommittee #MemberofDRUCCCommitteeofBallarpur #GaneshSaidane #Ballarpur #Ballarshah #NandigramExpress #BalharshahWardhatoBhusawal #BalharshahWardhatoBhusawalPassanger #Parking


13 Dec 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top