Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नियमित खेळण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते - मो. मेहमूद मुसा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नियमित खेळण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते - मो. मेहमूद मुसा राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सम्मेलनाचे आयोजन आमचा विदर्भ -...
नियमित खेळण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते - मो. मेहमूद मुसा
राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सम्मेलनाचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २१ डिसेंबर २०२४) -
        राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे (Annual Sports Conference) वार्षिक क्रीडा सम्मेलन यशस्वीपणे संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा विषयक कवायतीचे सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी खो-खो, क्रिकेट, लगोरी, कब्बडी, लंगडी यांसारख्या (Team sports) सांघिक खेळांचा आनंद घेतला. तसेच (Individual games) वैयक्तिक खेळांमध्ये तीन पायांची शर्यत, रनींग, बॉल इन द बास्केट, बुद्धीबळ, बॅडमिंटन यांचे प्रदर्शन देखील करण्यात आले. या क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने पालकांना आपल्या मुलांसोबत विविध खेळ खेळण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आनंदी वातावरण निर्माण झाले. 

        मौजा बामनवाडा येथील समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालीत राष्ट्रीय पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सम्मेलनाचे आयोजन २० व २१ डिसेंबर रोजी करण्यात आले. प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक मोहमद मेहमूद मुसा (Mohammad Mehmood Musa) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक नदीम शेख (Nadeem Sheikh), हे होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती वाघमारे, राष्ट्रीय नर्सिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिका प्रिशीता थोरात व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडा सम्मेलनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक नदिम शेख यांनी केले. (Rashtriya Public School) (Rashtriya Nursing College)

        वार्षिक क्रीडा सम्मेलन उदघाटनाप्रसंगी संस्थेचे संस्थापक मोहमद मेहमूद मुसा यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, खेळामुळे शरीर फिट राहण्यात मदत होते. नियमित खेळण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते, खेळताना शरीर अधिक कॅलोरी जाळते, ज्यामुळे वजन कमी करण्यास किंवा नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. नियमित खेळामुळे सहनशक्ती आणि ताकद वाढते, शारीरिक क्रियाकलापामुळे हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते, ज्यामुळे हृदय-संबंधित आजारांचा धोका कमी होतो. खेळामुळे ताणतणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि आनंदाची भावना वाढते, खेळण्यामुळे शरीराची लवचिकता आणि संतुलन सुधारते, खेळांमध्ये सहभागी होता येणे अन्य लोकांशी संवाद साधण्यास आणि सामाजिक संबंध स्थापित करण्यास मदत करते. विविध खेळांमुळे नवीन कौशल्ये शिकता येतात आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारली जाते. खेळ म्हणजे फक्त आवडत असलेली क्रिया नाही, तर हे एक संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. (Bamanwada)

        नदिम शेख यांनी अध्यक्षीय भाषणात खेळांच्या महत्त्वाचा प्रभाव स्पष्ट केला. खेळ खेळल्याने फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. चपळता आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून खेळ महत्त्वाचा आहे, तसेच नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी खेळाचा वापर करून मानसिक आरोग्य सुधारता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, महाविद्यालये आणि संस्थांनी खेळाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संपूर्ण विकास होईल.

       वार्षिक क्रीडा सम्मेलनाच्या यशस्वितेकरिता राष्ट्रीय पब्लिक स्कूलचे सहायक शिक्षक वैभव तिडके तसेच सर्व शिक्षिका व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती वाघमारे यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले व यापुढेही याच प्रकारचे विविध कार्यक्रम शाळेतील मुलांसाठी घेण्यात येतील असे त्यांनी पालकांना सांगितले. (aamcha vidarbha)

#Sports #NationalPublicSchool #RashtriyaPublicSchool #AnnualSportsConference #Students #KhoKho #Cricket #Lagori #Kabaddi #Langadi #Teamsports #Individualgames #Threeleggedrace #running #ballinthebasket #chess #badminton #NadeemSheikh #MohammadMehmoodMusa #Bamanwada

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top