Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नगराळात 80 लोकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगराळात 80 लोकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्र नगराळा व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चे आयोजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट...
नगराळात 80 लोकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
प्राथमिक आरोग्य केंद्र नगराळा व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती (दि. 20 डिसेंबर 2024) -
       प्राथमिक आरोग्य केंद्र नगराळा व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन च्या विद्यमाने गुरुवार दि. 19 डिसेंबर ला नगराळा उपकेंद्रात येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कर्करोग तपासणी, मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व इतर किरकोळ आजाराची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचा जवळपास 80 लोकांनी लाभ घेतला. 
शिबिरामध्ये लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषोधोपचार देत संदर्भ सेवा दिली. (Citizens of the village) (experts) उपस्थित तज्ञानी गावातील नागरिकांना (Insect diseases) किटकजन्य आजार व इतर आजाराबाबत माहिती दिली व (Preventive measures) प्रतिबंधक उपाय करण्याबाबतच्या माहिती दिली. 

        यावेळी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे समन्वयक सुरज सोळंकी व त्यांची टीम तसेच नगराळाचे उपसरपंच राजेश राठोड, जिवतीच्या वैद्यकीय अधिकारी कु. प्रतीक्षा महाकुलकर, जिवतीचे आरोग्य सहाय्यक दीपक सोनारकर, जिवतीचे आरोग्य निरीक्षक संघरत्न ठमके, नगराळाचे आरोग्य सेवक रामा चव्हाण, आरोग्य सेविका माधुरी अरकरे, क्षेत्र कार्यकर्ता समीर गणवीर, आशा सेविका, आशा पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील नागरिक व महिला उपस्थित होते. (Up Sarpanch Rajesh Rathod) (Aamcha Vidarbha)

#MedicalCamp #healthcamp #PrimaryHealthCenterNagrala #PrimaryHealthCenter #TataCancerCareFoundation #Bloodpressurescreening #Diabetesscreening #Cancerscreening #Oralcancer #Breastcancer #Ovariancancer #Checkforminorailments #Insectdiseases #Citizensofthevillage #experts #Preventivemeasures #UpSarpanch #RajeshRathod

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top