नैसर्गिक पर्यावरण संस्था व आदर्श शाळेच्या वतीने पेन-बूकचे वाटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ डिसेंबर २०२४) -
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ (Balvidya Shikshan Prasarak Mandal) द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा (Adarsh Marathi Primary Vidyamandir Rajura) तथा आदर्श हायस्कूल राजुरा (Adarsh High School Rajura) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता (Dr.Babasaheb AmbedkarMahaparinirvana Din). यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या (Naisargik Paryavaran Sanvardhan & Manavta Vikas Sanstha) आणि आदर्श शाळेच्या वतीने विद्यार्थांना बूक - पेन भेट देण्यात आली. (Gift of books and pens to students) अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. काहींनी कविता, भीम गीत गायन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर (Bhaskar Rao Yesekar) यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका तथा नेफडो राजुरा तालुका महिला संघटिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था बादल बेले (Badal Bele Sir), जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार, स्काऊट मास्तर तथा चंद्रपूर जिल्हा सचिव नेफडो रुपेश चिडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका सुनीता कोरडे यांनी केले. आभार ज्योती कल्लुरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री धोटे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, वैशाली चीमुरकर आदर्श हायस्कूल चे शिक्षक नवनाथ बुटले, प्रशांत रागीट, विकास बावणे, मेघा वाढई, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदीसह स्काऊट गाईड, राष्ट्रीय हरीत सेना, इको क्लब, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य, संघटक यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी भास्करराव येसेकर व बादल बेले यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून परीक्षेच्या संदर्भात शुभेच्या दिल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती मनात न ठेवता अभ्यासात सातत्य ठेवून नियमितपणे लेखन, वाचन, पाठांतर ठेवावे असे आवाहन करण्यात आले. (aamcha vidarbha) (vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.