श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे आयोजन
एकोणविसावा बालाजी ब्रम्होत्सव सोहळ्या
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०६ डिसेंबर २०२४) -
राजुरा चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानास (Shri Tirupati Balaji Temple) एकोनविस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य एकोनविसाव्या ब्रम्होत्सव सोहळ्याचे (Brahmotsavam) आयोजन ५ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत परिसरातील गरजू अंध रुग्णांना उपचार होऊन दृष्टी लाभावी याकरीता मेडीकल कॉलेज सेवाग्राम (Medical College Sevagram) यांच्या सहकार्याने उद्या (दि. ८ ) ला (Cataracts) विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी (Eye examination) व कृत्रीम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. (Artificial Cataract Lens Implantation Surgery Camp) (Cataract surgery camp at Chunala on Sunday)
शिबीराचा उद्घाटन सोहळा सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून (Lions Club) लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तथा प्रकल्प निर्देशक डॉ. मंगेश टिपणीस (Dr. Mangesh Tipnis), अध्यक्ष म्हणून एसीबी लिमिटेड नागपूरचे अजय म्रिग, मुख्य अतिथी माणिकगड सिमेंट गटचांदूर चे युनिट हेड अतुल कन्सल, प्रमुख अतिथी अंबुजा सिमेंट उपरवाहीचे सीएमओ सुदीप दास गुप्ता, प्रमुख पाहुणे म्हणून साईकृपा ट्रान्सपोर्टचे संचालक दिलबागसिंग दांडा, एसीबी लिमिटेडचे मॅनेजर राजबीरसिंग तवर, एसीबी लिमिटेड चे जनरल मॅनेजर पि. के. वर्मा, वेंकटेश क्रशिंगचे संचालक चंद्रकांत वासाडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, उपविभागीय वनाधिकारी पवन जोंग, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, वेकोली बल्लारपुर क्षेत्राचे क्षत्रिय महाप्रबंधक इलियास हुसैन, वेकोली बलारपूर क्षेत्राचे एरिया प्लॅनिंग ऑफिसर सिरीपुरम चक्रवती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोडे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे समन्वयक श्रीकांत कुंभारे, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मेडिकल कॉलेज सेवाग्रामचे नेत्र प्रमुख डॉ. ए. के. शुक्ला, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, नेत्रचिकित्सक डॉ. शंकरराव बुऱ्हान, चुनाळा ग्रामपंचायतचे सरपंच बाळनाथ वडस्कर उपस्थित राहणार आहेत. शिबीर एक दिवसाचे असून तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना उद्दीष्ठाप्रमाणे अनुक्रमे सेवाग्राम येथे मोफत नेण्यात येईल व शस्त्रक्रियेनंतर शिबीरस्थळी परत सोडून देण्यात येईल. रुग्णांची नोंदणी शिबीरस्थळी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत केल्या जाईल. तरी परिसरातील मोतिबिंदू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा तसेच आयोजित सपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री तिरुपती बालाजी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर (Ex MLA Sudarshan Nimkar) व श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळाच्या वतीने करण्यात आले आहे. (aamcha vidarbha) (vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.