आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 04 डिसेंबर 2024)
बल्लारशाह पोलिसांची गुन्हेगारांवर धडाकेबाज कारवाई सुरूच आहे. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारशाह पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आज 4 डिसेंबरपर्यंत एकूण पाच आरोपींकडून 3 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 18 काडतुसे जप्त केली आहेत - बनावटीचे पिस्तूल, वीस काडतुसे आणि तीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत एकूण पाच देशी बनावटीची पिस्तुले, वीस काडतुसे आणि तीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. (Five accused arrested with country-made pistols and cartridges)
पत्रकार परिषदेत ठाणेदार सुनील गाडे यांनी सांगितले कि, मिळालेल्या माहितीच्या आधारे मुकेश उर्फ मुक्कू विश्वनाथ हलदार वय 28 साईबाबा वार्ड याला अटक करून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 18 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अमित चक्रवर्ती वय 34, साईबाबा वार्ड, बल्लारपूर याचा कडून खरेदीची माहिती मिळाल्यानंतर अटक करण्यात आली होती. अमित हा डिझेल चोरी प्रकरणात आधीच फरार होता. (Ballarpur police action)
दुसऱ्या घटनेत जितेंद्रसिंग गोविंदसिंग डीलन 29 शिव नगर वार्ड, काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी 20 फुकट नगर बामणी व संघर्ष उर्फ गोलू बंडू रामटेके यांना अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे असा एकूण 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कलम 3/25 आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमाक्का, अति. पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ दीपक साखरे यांच्या च्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, एपीआई ए.एस.टोपले, पीएसआई हुसैन शाह, एएसआई आनंद परचाके, सुनिल कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकुर, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवान कोट, विकास जुमनाके, शरदचंद्र कारूश, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खांडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, अनिता नायडू यांनी केली.
#Countrymadepistols #cartridge #Fiveaccusedarrested #BallarpurPoliceStation #Ballarpur #Thirtyswordsseized #swordseized #SunilGade #PoliceInspector #Chandrapur #aamchavidarbha #vidarbha #jantakibaatnews #Countrypistol #pistol #livecartridge #cartridge #gun
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.