Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: या ''ठाकरे'' ने दिले आता समर्थन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने...
''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन
संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले
@राजुरा विधानसभा क्षेत्र ७०
राजुरा (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) -
राजुरा विधानसभा क्षेत्रात सामाजिक चळवळीतून नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनविणारे संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी त्यांच्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला असून त्यांच्या याच व्यक्तिमत्वामुळे निवडणुकीत त्यांना विविध सामाजिक संघटना व कामगार संघटनेचे समर्थन मिळत आहे. दोन दिवसापूर्वी रोखठोक प्रहार कामगार संघटनेने सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना समर्थन दिल्याची घोषणा केली होती. आता त्यानंतर जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज अरविंद ठाकरे यांनी पाठिंबा आणि समर्थन दिल्याचे पत्र सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना दिले आहे. सुरज ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना दिलेल्या समर्थन पत्रात नमूद केले आहे कि, गेल्या वर्षानुवर्षे विकासापासून वंचित असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये वारंवार सत्ता उपभोगणाऱ्या आजी माजी आमदारांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने विकास कामासाठी संधी दिली परंतु या क्षेत्राची स्थिती जशीच्या तशीच आहे. करीता २०२४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या माध्यमातून विकास व्हावा या आशेने नव्या चेहऱ्याला संधी मिळावी या परिवर्तनाकरिता आपण राजुरा विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार असल्याने या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जय भवानी कामगार संघटना चंद्रपूर आणि विदर्भ नवनिर्माण पार्टी तर्फे आमच्या समस्त पदाधिकारी व सहकाऱ्यांतर्फे आपल्याला पाठिंबा / समर्थन आम्ही या पत्राद्वारे आपणास देत आहोत. अश्या आशयाचे समर्थन पत्र दिले आहे. 

बघा सूरज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट - 👉   Suraj A Thakare

सुरज ठाकरे यांचे कामगारांत व युवकांत मोठे स्थान आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते नेहमी आपले पडखड मत मांडत असतात. त्यांच्या तत्वाला जे पटत नाही त्याचा हे खडसून विरोध करतात मग त्यांच्या समोरचा प्रतिस्पर्धक कितीही बलशाली असेल त्याची तमा ते बाळगत नसतात. त्यांनी आम आदमी पार्टीची तिकीट मागितली होती. मात्र आम आदमी पार्टीची काँग्रेस सोबत युती असल्याने त्यांना तिकीट देण्यात आली नाही व ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले. त्यांची नेहमीच भाजप व काँग्रेस विरोधी भूमिका राहिली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात आलटून पालटून तेच प्रस्थापित नेते पुन्हा पाच वर्षे स्थानिक नागरिकांचे बर्बाद करतील हे दुःख त्यांच्या मनात होते म्हणून त्यांनी फेसबुकवर एक मार्मिक पोस्ट केली त्या पोस्ट मध्ये नमूद होते. ''जुन्या लोकांनी कामे केली असती तर.... परत त्यांना त्याच एजेंड्यावर निवडणूक लढवावी लागली नसती..... नव्या पिढीला संधी मिळालीच पाहिजे. त्यासोबत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या सोबत काढलेला फोटो सुद्धा काढला आहे. तत्पूर्वी त्यांनी ''पार्सल'' विरोधात मोठी भूमिका बजावली होती. मात्र आता त्यांनी संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना समर्थन दिल्याने त्यांचे बळ वाढले आहे. मोठी बाब म्हणजे कोणतीही नाजूक कडी दिसल्यास ''गनिमी काव्याने'' ''भूषण'' नावाचा संभाजीचा छावा विरोधकांच्या तंबूत सुरुंग लावत असल्याने प्रस्थापित नेत्यांच्या गटात धाकधुकी वाढली आहे.




#MaharashtraAssemblyElection2024 #GhusadiMahotsav #Shankhnad #Navchetna #Aadiwasi #Gond #Samuday #Nrutyakala #SocialWorker #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SambhajiBrigedPaksha #Congress #BJP #ShetkariSanghtna #RokhthokPraharKamgarSanghtna #Mahila #Muli #Atyachar #VidarbhaNavnirmanParty #JayBhavaniKamgarSanghtna #SurajThackeray #parcel

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top