''या'' उमेदवाराने आजी माजी आमदाराना घेतले निशाण्यावर
प्रत्येक शब्द बाण, कसं धुतलं पहा व्हिडीओ, जनता वाजवत राहिली टाळ्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. १५ नोव्हेंबर २०२४) -
संभाजी ब्रिगेडचे उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे हे जिवती तालुक्यात कॉर्नर सभा घेत आजी माजी आमदारांचा समाचार घेत आहे. जिवती तालुक्यातील हिमायत नगर येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून येथे मत मागायला आलेल्या उमेदवारांना मतदार चांगलेच खडसावत आहे. भूषण फुसे याना सुद्धा लोकांनी पाण्याची समस्या सांगितली, फुसे यांनी निवडून आल्यास पाण्याची व्यवस्था कशी करून देण्यात येईल याबाबत लोकांचे मार्गदर्शन केले तसेच पिण्याच्या पिण्याकरिता आरो सुद्धा लावू देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या पाण्याबाबतच्या नियोजन आराखडा ऐकताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत फुसे यांच्या दूरदृष्टी विचारांचे स्वागत केले. जिवती तालुक्यात अनेक गावात पाण्याची बिकट समस्या असून कुणीही पाण्याची समस्या असणाऱ्या गावात राहणाऱ्या मुलांना लग्नाकरिता मुलगी देत नाही आहे हि वस्तुस्थिती आहे.
जिवती तालुक्यातील सर्वात जास्त मुले पोलीस आणि सशस्त्र बळात जात आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी या मुलांना सराव करण्याकरिता साधं मैदान देऊ शकले नाही. स्वतःचे कॉन्व्हेंट खोलून बसलेले येथील लोकप्रतिनिधी नेते सरकारी शाळेकडे का बरं लक्ष घालतील. तुमचे मुले सरकारी शाळेत शिकले तर त्यांच्या खाजगी कॉन्व्हेंट, शाळा कश्या चालणार असा खोचक प्रश्न फुसे यांनी जनतेला विचारला. जिवतीत कुणीही आजारी पडला कि त्याला रेफर टू गडचांदूर नंतर चंद्रपूर अशी व्यवस्था वर्षानुवर्षे सुरू आहे. या तालुक्यात पुरेशी बस सेवा नाही, जमिनीचे पट्टे लोकप्रतिनिधी येथील लोकांना मिळवून देऊ शकले नाही. वाटल्यास वन जमिनी खाजगी कंपन्यांना देता येते मात्र गरीब कास्तकारांना हे देऊ शकत नाही. यासाठी रस्त्यावर उचलून कुणीही जनप्रतिनिधी आवाज उचलत नाही हि सुद्धा मोठी शोकांतिका आहे. जिवती, कोरपना, गडचांदूर, विरूर स्टेशन येथे साधं बस स्टॅन्ड बनवू शकत नाही. बस स्टॅन्ड नसलेल्या ठिकाणी तासनतास बसची वाट पाहत असलेल्या माया बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही हे कसले जनप्रतिनिधी, दहा वर्षे आमदारकी भोगल्यानंतर मंत्री पदाचे स्वप्न आजी माजी आमदारांनी पाहू नये असा टोला हि भूषण फुसे यांनी लगावला. हि व्यवस्था बदलवून घ्यायची असेल तर परिवर्तनाची हीच खरी वेळ असून फुसे यांनी मत देण्याचे आवाहन केले. भूषण फुसे यांच्या कॉर्नर सभेला मोठा प्रतिसाद मिळत असून आजी माजी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांना गुलाबी थंडीत घाम फुटत असल्याचे दिसून येत आहे.
श्री भुषण जी फुसे चांगला प्रचार करीत आहेत. जनजागृती महत्वाची आहे.मतदार जागृत झाला तरच मतांमध्ये परिवर्तन घडून येईल असे वाटते.
उत्तर द्याहटवा