आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा / गडचांदूर (दि. १७ नोव्हेंबर २०२४) -
राज्यात जनसामान्यांचे मोठे प्रश्न काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी सत्तेवर असतांना सोडविले नाही, उलट मिळेल तशी जनतेची भयावह लूट केली. या दोन्ही पक्षांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, तरूण, महिला, दिव्यांग या सर्वांना छळले, आता या सर्वांचा बदला घ्यायची संधी असून महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्तीचे सरकार आणण्यासाठी राज्यापुढील प्रश्न सोडविण्यासाठी ॲड. वामनराव चटप यांना विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी केले. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या. सभेनंतर शेतकरी संघटनेला मोठे जनसमर्थन मिळत असल्याची चर्चा गडचांदूर वासियांमध्ये सुरू होती.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांच्या झालेल्या भव्य प्रचारसभेत बच्चु कडू बोलत होते. वामनराव चटप म्हणाले की राजकीय, आर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती ला जनतेने कौल द्यावा, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उमेदवार ॲड.वामनराव चटप, दिनेश शर्मा, रंजना मामर्डे, रिपब्लीकन नेते सिध्दार्थ पांडे, खोरिप नेते प्रविण खोब्रागडे, अरूण नवले, निळकंठ कोरांगे, विलास धांडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन साईनाथ पिंपळशेंडे, प्रास्ताविक ॲड.दीपक चटप तर आभार सतीश बिडकर यांनी मानले. या सभेनंतर शहरात भव्य रॅली काढण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.