गोंडपिपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) -
गोंडपिपरी तालुक्यातील तारसा या गावातील काॅंग्रेस पक्षाच्या ७० कार्यकर्त्यांनी माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सत्तर कार्यकर्त्यांना शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावून त्यांचे स्वागत केले. दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी तारसा येथे झालेल्या भेटी दरम्यान गावकऱ्यांनी ॲड.वामनराव चटप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
गेल्या १५ वर्षांपासून हे गाव विकासापासुन वंचित राहिले. वामनराव चटप यांच्या कार्यकाळात खूप विकासकामे झाली, मात्र आता गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान, अभ्यासू व दमदार नेतृत्वाची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. आता त्यांना सहकार्य करण्याचा मनोदय गावकऱ्यांनी व्यक्त केला.
गोंडपिपरी तालुक्यात काॅंग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याचे समजले जात होते, मात्र तारसा सारख्या गावात मोठे परिवर्तन झाले असुन तालुक्यात सर्वत्र शेतकरी संघटनेचा झेंडा लहरतांना दिसत आहे. शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांच्या आश्वासक नेतृत्वात गोंडपिंपरी तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
#AdvWamanraoChatap #ShetkariSanghtna #Congress #GondpipariTaluka #MaharashtraAssemblyElection2024
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.