Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रातील या गावात ''गॅस्ट्रोची'' साथ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपचारादरम्यान महिला दगावली कोरपना (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) - लोकप्रतिनिधींच्या नाकर्त्येपणामुळे नारंडा गावात अलिकडच्या काळात साथीचे आजार वाढत...
उपचारादरम्यान महिला दगावली
कोरपना (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) -
लोकप्रतिनिधींच्या नाकर्त्येपणामुळे नारंडा गावात अलिकडच्या काळात साथीचे आजार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी सुंदराबाई उपासे वय ६५ नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या संदीप मोहूर्ले, वैदही गणपत वाडगुरे, लीलाबाई नीकुरे, पूनम लोनबले, आदित्य निकुरे, वैष्णवी परसुटकर यांच्यासह जवळपास २५-३० रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेत असून गावातील परिस्थिती गंभीर आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशाप्रकारचा आजार पसरत असल्याचा आरोप नागरिक लावत आहे.

स्वच्छते अभावी राजुरा विधानसभा क्षेत्रातील गावात गटारांचे पाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र घाण पसरली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन पण चुकीचे आहे. सर्वत्र अस्वच्छता असल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गावात पाणी शुद्ध नसल्यामुळे तथा पाण्याचा टाकीची स्वच्छता नियमित होत नागरिकांचा आरोप आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी यासाठी संवर्ग विकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे आम्ही लेखी निवेदन दिले आहे. त्वरित रोगप्रतिकारक फवारणी करून व गाव स्वच्छ करून साथीचे रोग नियंत्रणात आणावे अन्यथा नाकर्त्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 
आरोग्य विभागाचा वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.  लवकरच साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. स्वप्नील टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी, कोरपना 
#RajuraAssemblyConstituency #Gastro #patient #Naranda #Cleanliness #WasteManagement #BDO #GramPanchayat

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top