Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा आमचा विदर्भ - दीपक...
महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज
परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ ऑकटोबर २०२४) 
राजुरा विधानसभा क्षेत्रात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या व कोळश्यावर आधारित उद्योग तर आहे मात्र येथील प्रस्थापित नेत्यांना या उद्योगांचा फायदा करून घेता आला नाही म्हणून येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीसाठी पुणे मुंबई कडे जावे लागत आहे. हि परिस्थिती बदलवायची असेल तर परिवर्तनाची हीच योग्य वेळ, मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा असे आवाहन करत सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद बिरसा मुंडा व शहीद बाबुराव शेडमाके यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून नामांकन अर्ज भरला. 
आसिफाबाद रोड, रेल्वे फाटक जवळील महात्मा ज्योतिबा शाळेपासून तहसील कार्यालय पर्यंत रॅलीही काढण्यात आली. नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर रैली बल्लारशाह-बामणवाडा मार्गावरील बिरसा मुंडा चौकात पोहोचली. येथे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी रैलीत उपस्थित लोकांचे आभार मानले. काल सोमवारी शिवश्री भूषण फुसे यांनी घाणेरड्या प्रस्थापित राजकारणी पक्षांना नाकारून संभाजी ब्रिगेडचा झेंडा उचलला. फुसे यांनी मतदारांना आवाहन केले कि, तुम्हाला स्थानिक पातळीवर रोजगार, शेतमालाला रास्त भाव, चांगले रस्ते, अखंडित वीज, शेतीला मुबलक पाणी, स्थानिकपातळीवरच उपचाराची व्यवस्था पाहिजे असेल तसेच गुंडागर्दी, अवैध व्यवसाय यापासून मुक्तता पाहिजे असेल तसेच धर्म, जात पात अश्या प्रकारचे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना, महिलावर अत्याचार होत असताना साधा निषेधही न करणाऱ्या लोकप्रिय नावाचा लोकप्रतिनिधींना, शेवटची लढाई म्हणत रिंगणात उतारलेल्याना घरी बसविण्याची हीच खरी वेळ आहे. मतदारानी आता परिवर्तन करावे असे आवाहन शिवश्री भूषण फुसे यांनी केले. यावेळी सर्व शिवश्री गिरीधर बोडे, नामदेवराव ठेंगणे, संतोष टोंगे, राजू बोढे, प्रेमानंद डाहुले, संतोष निखाडे, अविनाश काळे, सुधाकर तिराणकर, संजय बांदूरकर, शंकर बोढे, आशिष आगरकर, प्रवीण काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Congrass #SwatantraBharatPaksha #VanchitBahujanAaghadi #BJP #AamAadamiParty #AssemblyElections2024 #MaharashtraAssemblyGeneralElection2024 #ChandrapurDist #SixassemblyconstituenciesinChandrapurdistrict #NamankanRaly

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top