Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हजारोंच्या रॅलीद्वारे ॲड. वामनराव चटप यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व अर्पण - ॲड. वामनराव चटप आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २९ ऑकटोबर २०२४)  रा...
राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व अर्पण - ॲड. वामनराव चटप
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ ऑकटोबर २०२४) 
राजुरा विधानसभा क्षेत्र गेल्या १५ वर्षांपासून विकासकामांच्या बाबतीत माघारले असून आता अधिक जलद गतीने विकास कामे करण्याची गरज आहे. विविध माध्यमातून निधी मिळवून आपला मतदारसंघ अधिकाधिक प्रगत आणि विकसित करण्याचा माझा निर्धार आहे. यासोबतच शेतमालाला रास्त भाव आणि शेतकरी विरोधी धोरणे राबविणा-या व्यवस्थेविरूध्द लढा अधिक जोमाने करणार आहे. आपली ही शेवटची लढाई असून नागरिकांच्या हक्कासाठी आणि सर्वांगिन विकासासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढ संकल्प केला असून मतदारांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार ॲड. वामनराव चटप यांनी साईराम मंगल कार्यालय, राजुरा येथे आयोजित रॅली नंतर हजारो नागरिकांच्या साक्षीने झालेल्या सभेत व्यक्त  केले. 

राजुरा शहरातील भवानी मंदिर ते गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात आली. तिथे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ॲड. वामनराव चटप रॅली द्वारे साईराम मंगल कार्यालयात गेले. तेथे जाहीर सभा झाली. आज शेतकरी संघटनेच्या भव्य रॅली ने विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले असल्याची प्रचिती आली.

या रॅलीत अरूण नवले, निळकंठ कोरांगे, शालिक माऊलीकर, रामकृष्ण सांगोडे, अंकुर मल्लेलवार, शब्बीर जहागिरदार, नरर्सिंग हामणे, उध्दव गोतावळे, सुदामा राठोड, अशोक नामोल्लेख, विनोद पवार, इस्माईल भाई, साईनाथ बुचे, दत्ता राठोड, रमाकांत मालेकर, सुनिल बावणे,श्रीनिवास मुसळे,विलास धांडे, मदन सातपुते, वंदनाताई चटप, तेजस्विनी कावळे, पोर्णिमा निरंजने, सिंधु बारसिंगे, रूखमा राठोड, सुषमा मडावी यांचेसह शेतकरी संघटना, महिला आघाडी, युवा आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांचेसह दहा हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Congrass #SwatantraBharatPaksha #VanchitBahujanAaghadi #BJP #AamAadamiParty #AssemblyElections2024 #MaharashtraAssemblyGeneralElection2024 #ChandrapurDist #SixassemblyconstituenciesinChandrapurdistrict #NamankanRaly #AdvWamanraoChatap

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top