Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उच्च विद्या विभूषित सामाजिक कार्यकर्त्याने घाणेरड्या प्रस्थापित राजकारणी पक्षांना नाकारून सामाजिक संघटनेचा झेंडा उचलला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मंगळवारी भरणार नामांकन, रैली चे आयोजन राजुरा (दि. २८ ऑकटोबर २०२४) - संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजात काम करणारी संघटना ...
मंगळवारी भरणार नामांकन, रैली चे आयोजन
राजुरा (दि. २८ ऑकटोबर २०२४) -
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले असल्याने ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. बहुजन व समतावादी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांचा आज गडचांदूर येथे संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश झाला असून शिवश्री भूषण मधुकरराव फुसे हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री भूषण फूसे यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते शिवश्री भूषण मधुकरराव फुसे हे राजुरा विधानसभेला लाभलेले ''भूषण'' असून आता खऱ्या अर्थाने येथील नागरिकांना सर्वसामान्य माणसांचा समस्या जाणून घेणारा माणूस मिळाला, आपण मागील काही काळापासून पाहतोय एकीकडे साहेब, भाऊ, बंधू, दादा, मामा नावाचे लोकप्रिय शब्द लावणारे नेते नट्या, अभिनेत्री, दांडिया, गरबा, डान्सचे आयोजन करून गर्दी जमा करत होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी डॉ. लक्ष्मण यादव, प्रा. वसंत हंकारे सारखे समाजाला जागृत करणारे वक्त्यांना आणून व्याख्यानाचे आयोजन करत समाजात जनजागृतीचे कार्य केले आहेत. त्यांचे असे विचार व समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो हे धोरण पाहता संभाजी ब्रिगेडला खऱ्या अर्थाने सक्षम उमेदवार मिळाला असून सर्वानी भूषण फुसे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 

मंगळवार दि. २९ ऑकटोबर रोजी शिवश्री भूषण फूसे हे नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असून आसिफाबाद रोड, रेल्वे फाटक जवळील महात्मा ज्योतिबा शाळेपासून तहसील कार्यालय पर्यंत रॅलीही काढण्यात येणार आहे. तरी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने, प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन शिवश्री भूषण फुसे यांनी केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Congrass #SwatantraBharatPaksha #VanchitBahujanAaghadi #BJP #AamAadamiParty #AssemblyElections2024 #MaharashtraAssemblyGeneralElection2024 #ChandrapurDist #SixassemblyconstituenciesinChandrapurdistrict

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top