गडचांदुर (दि. 12 सप्टेंबर 2024) -
गावातील भांडण, तंटे गावातच सोडविण्यासाठी व गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे 10 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत येथे आमसभा घेऊन तंटामुक्ती समितीची सभा घेऊन बहुमताने गजानन उरकुंडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
लखमापूर येथिल तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाकरीता शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सध्याचे तं.मु. अध्यक्ष प्रवीना विनोद टोंगे तर भाजपा आणि काँग्रेसच्या वतीने गजानन उरकुंडे या दोन परस्पर विरोधी पक्षाचे समर्थित उमेदवारांची नावे समोर आली. गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. यात गजानन उरकुंडे यांना 300 मत तर प्रविणा टोंगे यांना 130 मते मिळाली. यात यात गजानन कुरकुंडे यांचा 170 मतांनी दणदणीत विजयी झाला. कांग्रेस आणि भाजपा च्या वतीने विजयी उमेदवारांचे अभिंनंदन करण्यात आले. या मतदान करिता लखमापूर येथील एकनाथ वडस्कर सर, संभाजी खामनकर, शंकर उरकुडे, संजय थिपे, अरुण जुमनाके, सरपंच सुरेश चौधरी, दिलीप थिपे, किशोर काळे, शुभम थिपे राजू बावणे, रवींद्र वडस्कर शुभम उरकुडे, अक्षय पोतराजे, रोशन, अक्षय थिपे, प्रतीक पिंपळशेंडे, बिरबल जुमनाके, गणेश थिपे, गौरव पाचभाई, गजानन पारखी आदी भाजपा आणि कांग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
#aamchavidarbha #tantamuktsamiti #lakhamapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.