जिवती महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयाचा व्हिडीओ वायरल
सहा दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी टेबल ठोकत दाखविला होता आक्रमक पावित्रा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती (दि. ११ सप्टेंबर २०२४) -
सहा दिवसापूर्वी दि. ४ सप्टेंबर ला भूषण फुसे यांनी जिवती तालुक्यातील महावितरण कार्यलयात जाऊन टेबल ठोकत आक्रामक पावित्रा दाखविला यात फुसे यांच्या हातून संगणकाचा स्टॅंड व कुर्सी तुटली यात महावितरणचे एक हजार रुपयाचे नुकसान झाले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रवीण देवतळे यांनी पोलिसांत याविषयी तक्रार नोंदविली. जिवतीतील महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांच्या अनेक समस्या होत्या. नागरिकांच्या समस्या घेऊन सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे महावितरण कार्यालयात गेले होते मात्र जणू आम्ही सरकारचे जावईच याप्रमाणे येथील नोकरी करणाऱ्यांची वागणूक बघता फुसे यांनी आक्रामक पवित्रा दाखविला होता.
एकीकडे बेरोजगारांना रोजगाराकरिता वणवण भटकावे लागत आहे तर दुसरी कडे सरकारी नोकरीवर असलेले कर्मचारी स्वतःला सरकारचे जावई समजू लागले आहे. नागरिकांची कामे वेळेवर न करणे, वेळ मारून नेणे, आज मिटिंग आहे, साहेब दौऱ्यावर आहे, सदर कागदपत्रात पुन्हा कागदपत्रे हवीत असे विविध कारणे देत सरकारी कर्मचारी सर्वसाधारण नागरिकांना वेठीस आणून ठेवतात. टेबल खालून लिफाफा दिला तर पटकन कामे होतात अशी अवस्था सरकारी कार्यालयांची झाली आहे. दि. १० सप्टेंबर ला पब्लिक एप नावाच्या बातमीपत्रावर जिवती महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. कार्यालयाच्या एका टेबलवर संगणक सुरु असून टेबलवरच कागदपत्रे, मोबाईल, पाण्याची बॉटल आणि पत्त्याचा खेळ चार मिळून खेळत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडीओ ची शहानिशा करत कार्यालयात पत्ते खेळणाऱ्या दोषींना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #Sabotagestyleagitation #aggressivemovement #distribution #Sabotage #Filedacase #RajuraAssemblyConstituency #Law #OfficeofPublicRelations #Farmers #women #generalcitizens #stingopration #patte #khel #Video
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.