Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कर्जाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी कोरपना (दि. ०९ सप्टेंबर २०२४) -         कोरपना तालुक्यातील धानोली (तांडा) येथील शेतशिवारात युवा शे...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. ०९ सप्टेंबर २०२४) -
        कोरपना तालुक्यातील धानोली (तांडा) येथील शेतशिवारात युवा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक ०९ सप्टेंबर ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हरिदास शेकोबा राठोड (वय ३०) रा. धानोली (तांडा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांने स्वतःच्या शेतात विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  त्याच्यावर बँकेचे कर्ज होते. आर्थिक विवंचनेमुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी. घटनेचा कोरपना पोलिसांनी पंचनामा केला असून पार्थिवाचे शव विच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करत आहे. मृतक शेतकऱ्याच्या मागे पत्नी, आई व एक दीड वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

#aamchavidarbha #jantakibaatnews #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #Dhanolitanda #farmer #Shetshiwar #suicide #Suicidebyconsumingpoison #Toxicpesticides #Toxic #pesticides #Hospital #KorpanaPoliceStation

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top