Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: क्रांतीची लाट उठविणाऱ्या नलफडी गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच ध्येय - अँड.संजय धोटे  राजुरा  (दि. 18 सितम्बर 2024) -              राजुरा मुक्तीसंग्राम दिन उत्सव स...

शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच ध्येय - अँड.संजय धोटे 
राजुरा  (दि. 18 सितम्बर 2024) -
             राजुरा मुक्तीसंग्राम दिन उत्सव समिती व  अँड.संजय धोटे मित्र परिवार यांच्या वतीने नलफडी गावातील चौकात राजुरा मुक्तीसंग्राम दिन जल्लोष सोहळा घेण्यात आला. यावेळी मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी असलेल्या मृताकांच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा धोटे, अध्यक्ष, मुक्तीसंग्राम दिन आयोजन समिती नलफडी यांची उपस्थिती होती. तर उदघाटक म्हणून कार्याध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा माजी आमदार अँड.संजय धोटे, यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्ह्णून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे सचिव व माजी जिप सदस्य अविनाश जाधव, प्रमुख अतिथी म्हणून अँड.अरुण धोटे, डॉ. उमाकांत धोटे, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे अध्यक्ष सतीश धोटे, नलफडी गावचे सरपंच अमित टेकाम, उपसरपंच प्रभाकर धानोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

        कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण, प्रतिमा पूजन करण्यात अली. उपस्थिताना मार्गदर्शन करताना अँड.संजय धोटे म्हणाले क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावांत मुक्ती संग्रमाचा जल्लोष होतांना मला आनंद होतोय. अन्याया विरुद्ध लढा देणाऱ्याना मानाचा मुजरा करीत शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती करणे हे माझे ध्येय असून प्रत्येकाच्या हाताला कामं ही संकल्पना मी पूर्णत्वास नेईल असे प्रतिपादन केले. अविनाश जाधव यांनी मुक्तीसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. आपल्या पूर्वजानी घेतलेल्या परिश्रमांची जाणीव युवा पिढीला व्हावी यासाठी असे कार्यक्रम गावागावांत होणे आवश्यक असल्याचे मत जाधव यांनी मांडले. राजुरा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी असलेल्या मृतकांच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील जेष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन व आभार बादल बेले, प्रास्ताविक अँड.अरुण धोटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. राजुरा मुक्तीसंग्राम दिन आयोजन समिती नलफडी गावातील युवक मंडळ, अँड.संजय धोटे मित्रपरिवार पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोहन धोटे, डॉ. अर्पित धोटे, विनोद धोटे, निखिल धोटे, अमय धोटे यांनी परिश्रम घेतले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #rajuramuktidin #marathvadamuktidin #haidrabadmuktidin #17saptember #rajuramuktisangramdin #utsavsamiti #AdvSanjayDhoteMitraParivar #AdarshShikshanPrasarakMandalRajura #ChhatrapatiShivajiMaharaj #IronManSardarVallabhbhaiPatel #BharatMata #BattleofRajuraLiberationWar #AdvSanjayDhote #SatishDhote #AvinashJadhav

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top