आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ ऑगस्ट २०२४) -
राजुरा - बल्लारपूर मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधकामामुळे आणि भरधाव वेगाने ट्रक चालवून ओव्हरटेक करण्याच्या नादात वर्धा नदीच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार एक युवक जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दिनांक 26 ऑगस्ट ला सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बामणी येथील गोयल रामप्रकाश मडावी, अरूण गेडाम हे आणखी एका आपल्या साथीदारासह बामणी येथून राजुरा येथे कॅटर्सच्या कामासाठी येत होते. बामणी नदीजवळ सम्मका सारक्का मंदीर परिसरात एका ट्रक ने दुसऱ्या ट्रक ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसऱ्या बाजुने येणाऱ्या या मोटरसायकल क्रमांक MH-34 U-2955 च्या स्वारांनी गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बाजुला राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने तेथे माती पसरली आहे. पाऊस आल्याने या मातीवरून या युवकांची गाडी घसरली आणि ते ट्रकच्या बाजुला पडले. या दुर्घटनेत गोयल रामकिसन मडावी वय 18 हा जागीच गतप्राण झाला. दुसरा युवक मारोती अरूण गेडाम वय 22 जबर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तिसरा युवक मात्र सुदैवाने बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार योगेश्वर पारधी अधिक तपास करीत आहेत.
राजुरा ते बल्लारपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर ट्रकची मोठी वाहतूक सुरू असल्याने दुचाकीस्वारांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. ट्रकचालकही अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकतात. या दुर्घटनेत ट्रक चालकाच्या आतताईपणामुळे एका युवकाला आपला नाहक जीव गमावावा लागला आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #jiwati #jiwatitahasil #nagrala #accident #WardhaRiver #RajuraBallarpurRoad #NationalHighwayConstruction #Overtake #youth #killed #seriouslyinjured #Bamni #Catersworks #ChandrapurDistrictHospital #Diedonthespot #RajuraPoliceStation #PoliceInespector
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.