जिवती तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ ऑगस्ट २०२४) -
शेती आणि निराधार योजनेतील पैशाच्या वादातून मुलाने वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. जिवती तहसील मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या नगराळा येथे २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मृतकाचे नाव शिवराम नागोबा चित्तेबोईनवाड (65) तर मुलाचे नाव रामप्रसाद चित्तेबोईनवाड (43) अशी आहेत. जिवती पोलिसांनी मुदखेड रेल्वे स्थानकावरून आरोपी मुलाला अटक केली.
नगराळा येथील मृतक शिवराम चित्तेबोईनवाड यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. शुक्रवारी दुपारी मुलगा रामप्रसाद याचा वडील शिवराम यांच्याशी निराधार योजनेतील पैसे आणि शेतीच्या पैशावरून वाद झाला. प्रकरण इतके वाढले की, रागाच्या भरात रामप्रसादने वडिलांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रामप्रसाद फरार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. मृताचा नातू महेश फुलवाड (20) नगराळा येथे आला असता त्याला त्याचे आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांने तत्काळ गावकरी व पोलिसांना माहिती दिली. जिवती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. हत्येचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती गोळा केली. काही तरुणांच्या गुप्त माहितीवरून आरोपी रामप्रसाद याला रेल्वेतून पळून जाण्यापूर्वी मुदखेड रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. वरील कारवाई पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक कोमलकुमार सूर्यवंशी, पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर डोकळे, रमाकांत केंद्रे, किरण वटोरे, शरद राठोड, अशोक मुंगल आदींनी केली. या घटनेचा अधिक तपास जिवती पोलीस करत आहेत.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #jiwati #jiwatitahasil #nagrala #murder #crime #child #father #sharpweapon #MudkhedRailwayStation #Accusedarrested #sanjaygandhiniradharyojna #farming #police #Jiwatithepolice #fugitive #SubDivisionalPoliceOfficer #PoliceInspector #PoliceSubInspector
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.