Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जड वाहतूक, रस्त्याचा कडेला ट्रकांचा रांगा, निष्काळजीपणे वाहन चालकांवर कारवाई करा - हितेश चव्हाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतुक समस्येवर लक्ष देण्याकरिता आरटीओला निवेदन मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था गडचांदूर द्वारे निवेदन  आमचा...

चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतुक समस्येवर लक्ष देण्याकरिता आरटीओला निवेदन
मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था गडचांदूर द्वारे निवेदन 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
गडचांदूर (दि. २४ ऑगस्ट २०२४) -
        देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातामध्ये भारताच्या क्रमांक खूप वरचा आहे, तसेच रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन हाकने, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, रस्त्याचा कडेला बेजबाबदारपणे वाहन उभे ठेवणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा एकना अनेक कारणांचा समावेश आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन हे महत्त्वाचे आहे. वाहतुकींच्या बाबींची अंमलबजावणीचे कार्य प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहे. मात्र याकडे सदर विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. 

        चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यामध्ये कोळसाखानी, सिमेंट उद्योग, विद्युत निर्मिती केंद्र, पेपर उद्योग, बांबू उद्योग, लाईम स्टोन खदानी तसेच इतर उद्योग सोबतच रेती, मुरूम, दगड, मातीची अवैध वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर अवैध वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असून मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे सेवक निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला गाड्या लावणाऱ्या गाडी चालकांना गाडी रस्त्यावर अशी का लावता असे विचारले असता, वाहनचालक आम्ही आरटीओला लाखो रुपये हप्ते देतो, तुम्ही आमचं काय वाकड करणार म्हणून भांडण करतात वेळेप्रसंगी मारण्याकरिता लोखंडी रॉड उभारतात. रस्त्याचा कडेला निष्काळजीपणे वाहने उभी केल्याने अपघात होत असून निष्पाप लोकांचा बळी जात आहे. निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये हे मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था गडचांदूर चे ध्येस असून यासाठी संस्थेचे सेवक हा खाटापिटा करीत असून सदर समस्येवर लक्ष वेधण्याकरिता उपप्रादेशिक अधिकारी किरण मोरे यांना निवेदन देण्यात आले. नमूद बाबींचे पालन न झाल्यास 31 ऑगस्ट 2024 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था गडचांदूरचे अध्यक्ष हितेश आबाजी चव्हाण यांनी दिला आहे. निवदेन देते वेळी प्रदीप गुड्डेलीवार, यशवंत बद्दकल उपस्थित होते. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #accident #devdoot #truck #bike #108call #Ambulance #KorpanaTaluka #GadchandurRuralHospitals #BharatiyaJanataPartyBhatkeVimuktAghadi #jilhadhyksha #HiteshChavan #RTO #MitranganBahuuddeshiyaGraminVikasSansthaGadchandur #RegionalTransportDepartment #Parking #vehicle #roadside #Violationof trafficrules #Accident #statement #Nivedan #SubRegionalOfficerChandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top