Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची आढावा बैठकी संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा विधानसभेत आतापर्यंत ७७,१२१ बहिणींनी केला अर्ज तर ६९,७९९ बहिणींचे अर्ज मंजूर! आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ ऑगस्ट २०२४) -   ...

राजुरा विधानसभेत आतापर्यंत ७७,१२१ बहिणींनी केला अर्ज तर ६९,७९९ बहिणींचे अर्ज मंजूर!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ ऑगस्ट २०२४) -
       महायुतीच्या लोककल्याणकारी राज्य सरकारकडून राज्यातील विविध घटकांसाठी विविधांगी योजनांचा धडाका सुरू आहे; यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची व्यापकता आता दिसून येत आहे. तळागाळातील गोरगरिब बहीणींच्या संसारास छोटीशी मदत व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलावे म्हणून राज्य सरकारने ही योजना आणली आहे.

        राजुरा येथील पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत प्राप्त, मंजुर व नामंजुर अर्जांची आकडेवारी सभागृहासमोर मांडण्यात आली. त्यानुसार दि. ०६ ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत ५०५०५ अर्ज समीतीस प्राप्त झाले असून त्यापैकी ४५३९१ अर्जांचा मंजुरी देण्यात आली होती. तर आजच्या बैठकीत समीतीपुढे २६६७५ अर्ज प्राप्त झाले व त्यापैकी २४४०८ अर्जांना समीतीने मंजुरी दिली आहे. जे अर्ज त्रुट्यांमुळे नामंजुर झाले आहेत, त्यांची माहिती तातडीने संबंधित अर्जदार बहिणीस देऊन त्या त्रुटी दूर करून त्यांनाही या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळेल यासाठी सर्वांनी संबंधित कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सी.आर.पी. भगीनी यांना योग्य निर्देश देण्यात आले आहे. 

        या बैठकीला योजनेच्या विधानसभा समीतीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, विधानसभा समीती सदस्य रमेश दिगनलवार, समिती सदस्य आशिष ताजणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुरज जाधव, गोंडपिपरीचे नायब तहसीलदार साईकिरण आऊलवार, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, नोकारीचे उपसरपंच वामन तुराणकर, संजय गांधी निराधार योजना समीतीचे सदस्य सुरेश रागीट व दिलीप गिरसावळे यांचेसह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar ##mukhyamantrimajhiladakibahinyojna #aadhavabaithak #Reviewmeetings #GrandAlliance #mahayuti #PanchayatSamitiRajura #RashtrasantTukdojiMaharajAuditorium #Statisticsofapplicationsreceivedapprovedandrejected #Employees #AnganwadiSevika #AshaWorker #CRPsister #DevraoBhongle #RajuraAssembly

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top