Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पहाडावरच्या समस्या सोडवण्यासाठी पहाडावरचंच एक वेगळ नेतृत्व निर्माण व्हावं - लक्ष्मीकांत कोटनाके
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेडवाही (भारी) येथील नाल्यावरील पुलाची दुरावस्था पुलाची तात्काळ दुरस्ती करण्याची गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा जि...

शेडवाही (भारी) येथील नाल्यावरील पुलाची दुरावस्था
पुलाची तात्काळ दुरस्ती करण्याची गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. २४ ऑगस्ट २०२४) -
        जिवती तालुक्यातील भारी वरून शेडवाही मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

        जिवती तालुक्यामध्ये समस्यांचा भडीमार आहे, पावसाळ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, तसेच दळणवळणाच्या मार्गावरही नागरिकांना मोठी कसोटी करावी लागत आहे, तालुक्यातील शेडवाई (भारी) येथील नाल्यावरील पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत अनेकवेळा लक्षात आणून देखील या समस्या कडे दुर्लक्ष होत आहे. जिवती तालुक्यातील शेडवाई, भारी, बाबापुर आणि मराई पाटन रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांची मोठी हाल अपेष्टा होत आहे, याबाबत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके आणि भारी ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी नाल्यावरील पुलाची तातडीने दुरस्ती करण्याची मागणी केली आहे. 

        भारी क्षेत्रातील लखमापूर येथील रस्त्याचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत अनेक वेळा पंचायत समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी निवेदन देऊनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करत असताना मोठी कसोटी करावी लागत आहे. मग स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकं कुणाच्या समस्येकडे लक्ष करत आहे असा प्रश्न भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केला आहे. 

       चंद्रपुर, शंकरपठार ते भारी बससेवा सुरू करण्यात यावी तसेच राजुरा, भारी ते बाबापूर बससेवा सुरू करण्याची मागणी सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केली गेल्या दीड महिन्यापासून अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा करूनही प्रशासन आणि लोक्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही आमचे प्रश्न कुणाकडे मांडायचे असा सवालही कोटनाके यांनी केला आहे. पहाडावरच्या समस्या सोडवण्यासाठी पहाडाचे एक वेगळ नेतृत्व निर्माण व्हावं ते पहाडावरची लोकचं निर्माण करतील आता पहाडाचा वापर आता मतदानापुरता होऊ द्यायचा नाही असे मत भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #conditionofthebridge #bridge #People'srepresentatives #GondwanaGantantraParty #GajananJumanake #LaxmikantKotnake #Sarpanch #Startbusservice #STBus

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top