निषेध आंदोलन व तक्रार दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 02 जुलै 2024) -
सार्वभौम भारताच्या सर्वोच्च सभागृहात कॉंग्रेसचे वाचाळवीर विरोधी पक्षनेते, खासदार राहूल गांधी यांनी देशभरातील हिंदू धर्मातील बांधवांबद्दल अपशब्द वापरत गरळ ओकली. त्यामुळे संपुर्ण भारतभर हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत; त्यांच्या या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवत माजी आमदार अँड. संजय धोटे, विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार, भारतीय जनता पार्टी राजुरा तालुका व शहरच्या वतीने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करून खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर, पोलीस स्टेशन राजुरा येथे जाऊन त्यांचेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, सतीश धोटे, विनायक देशमुख, अरूण मस्की, वामण तुराणकर, सतीश कोमरवेल्लीवार, दिलीप गिरसावळे, सचिन शेंडे, बाळनाथ वडस्कर, हरिदास झाडे, अजय राठोड, दिपक झाडे, प्रदिप पाला, राजकुमार बोगा, गणेश रेकलवार, मंगेश श्रीराम, महेश रेगुंडवार, नितीन वासाडे, स्वप्नील राजुरकर,संजय जयपुरकर, नितिन बांब्रटकर, सिनू पांजा, अजय सकिनाला, राजू डोहे, सईद कुरेशी, पुणम शर्मा, शिवा बोंकुर, कैलास कार्लेकर, सोमेश्वर आईटलावार, किशोर रागीट, लक्ष्मी बिस्वास, समीर बेदावार, आदित्य धोटे, मंगल चव्हाण यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #bjp #rahulgandhi #hindu #tahasilofficerajura #protest #nishedhaandolan #advsanjaydhote #deoravbhongale #satishdhote #sunilurkude
हिंदू सहिष्णू आहेत म्हणून देश अखंडित आहे.बाकीच्यांचे वागणे पाहून तो पणं आक्रमक भूमिका घेत आहे.
उत्तर द्याहटवा