उपविभागीय अधिकाऱ्यांनी गाठले विसापूर
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 03 जुलै 2024) -
भाजप नेते संदीप पोडे यांच्या प्रयत्नामुळे विसापूर वासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
विसापूर रेल्वे अंडरपास बंद पडल्याने व पर्यायी मार्गाची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांची होणारी वाहतूकीची समस्या विसापूर विकास कार्य समिती चे अध्यक्ष तथा भाजप नेते संदीप पोडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे निवेदना द्वारे केली होती. ही बाब गांभीर्याने घेत त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक व एसडीओ यांना सूचना दिल्या त्याअंतर्गत मंगळवार 2 जुलै रोजी एसडीओ अजय चरडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक संतोष अतकरे, भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे, प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे, विसापूर विकास कार्य समिती चे अध्यक्ष भाजप नेते संदीप पोडे, भास्कर पेंदोर, निखिल घुगलोत यांनी सादरीकरण करून बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे अंडरपासची पाहणी केली. रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदाराच्या संथ कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत एसडीओंनी पर्यायी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. स्वीय सहाय्यक अतकरे यांनी दोन वेळा विसापूरला भेट देऊन नागरिक, रेल्वे अधिकारी, ठेकेदार, राज्य प्रशासनाला पालकमंत्र्यांच्या सूचनांबाबत माहिती दिली. या वेळी उपस्थिती भाजपा चे वरिष्ठ नेते मनोज सादराणी, प्रदीप गेडाम, बंडू गिरडकर, अविनाश सोनटक्के, नरेंद्र इटणकर व शेकडो गावकरी उपास्थित होते. या पुर्वी 1 जुलै रोजी एसडीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत एसडीओंनी संबंधित ठिकाणी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #visapur #ballarshah #sdo #bjp #sudhirmungantiwar #railwayunderpass #railway
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.