आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 03 जुलै 2024) -
डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते. देवा नंतर माणसाला दुसरे जीवन देणारे हे डॉक्टरच असते. अशा देवरूपी डॉक्टरांनी चंद्रपूर येथे दिनांक 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवसाचे औचित्य साधून शहरात वैद्यकीय व्यवसायाच्या रूपात सेवा करीत आपल्यातील सेवाभावी वृत्ती तसेच सामाजिक दायित्व जपत चंद्रपूर येथील आय.एम.ए. डॉक्टर संघटने कडून परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत वृक्ष वाचवा जग वाचवा असा संदेश देत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड ही जनतेची चळवळ झाली पाहिजे अशी भावना उपस्थित सर्व डॉक्टरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. विपिन पालीवार आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कल्पनाताई गुलवाडे, मा.रामगावकर मुख्य वनरक्षक चंद्रपूर, मा. सुनील गाडे ठाणेदार रामनगर पोलीस स्टेशन हे होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ.योगेश सालफडे, डॉ.अनुराधा सालफडे, डॉ.पल्लवी इंगळे, डॉ. प्राजक्ता आस्वार, डॉ.प्रीती चव्हाण, डॉ.अप्रतिम दीक्षित, डॉ.बोगावार, मा.अनिल ताहिलांनी, डॉ.मनीषा वासाडे, डॉ.इमरान अली शिवजी, डॉ.रिजवान अली शिवजी, डॉ.प्रवीण पंत, डॉ.यामीनी पंत, मा.ताहेर, डॉ.पुनम नगराळे, डॉ.स्नेहल पोटदुखे, डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.अमित देवईकर, डॉ.अर्पणा दिवईकर तसेच मोठ्या संख्येने शहरातील डॉक्टर व त्यांचे चमू प्रमुख्याने उपस्थित होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.