Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या रुग्णांची देवराव भोंगळेंनी मेघे सावंगीत घेतली भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुटुंबातील सदस्य भेटीला गेलेल्या 'देव'राव समोर रुग्णांना अश्रू अनावर आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ११ जुलै २०२४) -         भा...

कुटुंबातील सदस्य भेटीला गेलेल्या 'देव'राव समोर रुग्णांना अश्रू अनावर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ जुलै २०२४) -
        भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे सुरू असलेल्या ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून मागील महिनाभरात कोरपना, गोंडपिपरी, जिवती व गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते; या शिबीरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर निःशुल्क रोगनिदान व उपचार पार पडले. त्याचबरोबर ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया निघाल्या त्यांना तुकडीनिहाय सावंगी (मेघे) येथे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अनेकांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या तर अनेक रुग्णांवर येत्या काही दिवसांत वैद्यकीय सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया संपन्न होणार आहेत. या भरती रुग्णांना भेटण्यासाठी म्हणून काल (दि. ०९) देवराव भोंगळे यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. प्रसंगीच प्रत्येक रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. 

        आजारपणात सगेसोयरे आपले होत नाही, पण एका कौटुंबिक सदस्याप्रमाणे देवराव भोंगळे हे आमच्या भेटीला आले म्हणत अनेक रूग्णांनी याप्रसंगी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी गोंडपिपरीचे नगरसेवक राकेश पुण, गणेश मेरूगवार, शिथील लोणारे, मनोज वनकर तसेच रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top