आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ जुलै २०२४) -
प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आमदार सुधाकर अडबाले यांना निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णय १४ मार्च २४ अन्वये खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षांनंतर सुधारित सेवांतर्गत दोन लाभाची आश्वासित योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. मात्र राज्यात नागपूर विभाग वळगळता इतर जिल्ह्यातील पुणे, सोलापूर, लातूर, सातारा, अहमदनगर, नंदुरबार विभागात सरळ लेखाधिकारी यांच्याकडून वेतन निश्चिती करण्यात आल्या तसेच अमरावती विभागात शिक्षणाधिकारी यांचे मंजुरीनी करण्यात आल्या आहेत. परंतु नागपूर विभागात अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई सुरू झालेली नसल्याने शिक्षकेतर कर्मचारी या योजनेपासून वंचित आहेत. तेव्हा आश्वासित योजना लागू करून सुरू करण्यात यावी, अशी मागणी यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केली.
या संदर्भात शिक्षण उपसंचालक नागपूर यांना महामंडळाच्या वतीने आपल्या विभागात एकसुत्रता असावी म्हणुन दिनांक दोनदा निवेदन देण्यात आले तसेच शिक्षक आमदार यांच्या १४ जूनच्या सभेत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सांगीतले. परंतु अजूनपर्यंत कार्यवाही झाली नसल्याने शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देताना मोरेश्वर वासेकर, प्रशांत हजारे, अशोक काचिनवार, उदय धकाते, गणेश गेडाम, अनंता चौधरी, सुनील झाडे, प्रवीण रासेकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.