Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नवीन शिक्षण धोरणावर शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय कार्यशाळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा ( दि. ०८ जुलै २०२४) -         गोंडवाना विद्यापीठ आणि शिवाजी महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिव...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा ( दि. ०८ जुलै २०२४) -
        गोंडवाना विद्यापीठ आणि शिवाजी महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालयात एक दिवसीय नवीन शिक्षण धोरणावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिष्ठाता डॉ.अनिल चीताडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे उपस्थित होते. त्यांनी नवीन शिक्षण धोरणावर विस्तृत अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. 

        यावेळी प्रमुख मार्गदर्शक आनंद निकेतन महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शंकरराव बेझलवार महाविद्यालय अहेरीचे प्राचार्य डॉ. रवींद्र हजारे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड यांनी केले, संचालन प्रा.गुरुदास बल्की यांनी तर आभार राजेश खेरानी यांनी मानले. कार्यशाळेत विविध महाविद्यालय मधील दोनशे प्राध्यापक उपस्थित होते. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #rajura #education #ShivajiCollegeRajura #GondwanaUniversity #workshop #NewEducationPolicy #Gadchiroli #ViceChancellor

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top