Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अमराई वार्डातील नागरिकांच्या घरात शिरले नालीतील घाण पाणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संतप्त महिलांची तहसिल कार्यालयावर धडक ॲड. वामनराव चटप यांनाही दिले निवेदन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २२ जुलै २०२४) -         राजुर...
संतप्त महिलांची तहसिल कार्यालयावर धडक
ॲड. वामनराव चटप यांनाही दिले निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २२ जुलै २०२४) -
        राजुरा शहरातील आमराई वार्डात पावसाचे पाणी नालीवरून ओसंडून वाहून नागरिकांच्या घरात तब्बल दोन ते तिन फुट आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. राजुरा नगर पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप असून या नाल्यांचे काम तातडीने करावे, जवाहर नगर वार्डातील नालीचे सरळ जाणारे पाणी वळवून आमराई वार्डात आणणाऱ्या नाल्यांची खोली व रूंदी वाढवून योग्य नियोजन करावे, येथील नाल्यांतील गाळ काढून स्वच्छता करावी, अतिक्रमण काढून सांडपाणी वाहून जाणारी नाली मोकळी करावी अशा मागण्या आमराई वार्ड येथील महिलांनी राजुराचे  तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांना भेटून निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  

        यावेळी माजी जि.प.सदस्य तेजस्विनी कावळे, मनीषा गायकवाड, वंदना पोटे, मनीषा चापले, कुसुम गायकवाड, रेखा बोडे, काजल सांदुरकर, काजल बानकर, रागिनी राजूरकर, अश्विनी लांडे, मंजुषा जयपुरकर, शारदा भंडारे, प्राची कावळे, बहिणाबाई राठोड, रूपा भलावी, स्नेहा सातपुते, सोनाली डाखरे, सुवर्णा घटे, शीला चौधरी, मंगला जीवतोडे, ज्योती तुमराम, वर्षा कावळे, अर्चना कारेकर, अल्का बोबडे, कुसूम वांढरे, माजी पं.स. सभापती बाबा कावळे, सुदर्शन गायकवाड, अशोक पोटे, दिलीप चापले, बबन गोरे, सतीश सांदुरकर, पंडित बानकर, शैलेश लांडे, नितीन जयपुरकर, अमोल भंडारे, प्रफुल कावळे, महेंद्र भलावी, रमेश चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #AmraiWard #jawaharnagar #wamanraochatap #advwamanraochatap #Dirtywaterfromthedrainenteredthehouse #tahasilofficerajura #tahasildarrajura #nagarparishadrajura #rainwater #angrywomen #women #statement #Drain #muncipalcouncilrajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top