Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुराची यशस्वी रामरतन चापले नीट परीक्षेत 667 गुण घेत जिल्ह्यातून प्रथम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ७ जून २०२४) -         नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये राजुरा येथील रहिवाशी यशस्वी रामरतन...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ७ जून २०२४) -
        नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये राजुरा येथील रहिवाशी यशस्वी रामरतन चापले हीने पहिल्याच प्रयत्नात 720 गुणापैकी 667 गुण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी दरवर्षी नीट परीक्षा घेतली जाते. यशस्वी ने चंद्रपूर केंद्रावरून ही परीक्षा दिली. यशस्वी ही लहानपणा पासून अभ्यासात हुशार होती. इयत्ता 10 वी तिला 98% आणि यावर्षी 12 वी ला 91% गुण प्राप्त केले. यशस्वी चे आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहे. यशस्वी ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे. यशस्वी च्या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #education #Goodexam #YashasviRamratanChaple #Medicalaccess #ZillaParishadTeacher

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top