विरूर स्टेशन (दि. 7 जून 2024) -
अन्न धान्याच्या काळाबाजारवर अंकुश लावण्याकरिता व धान्य वाटपात पारदर्शकता आणण्याकरिता राज्यात मागील काही काळापासून पॉस मशीन वर बायोमेट्रिक पद्धतीने सरकारी वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप सूरू आहे. त्यात राजुरा तालुक्यातील 108 दुकानदारांना मागील पाच वर्षापासुन धान्य वाटप करण्यासाठी 2G पाॅस मशिन दिल्या होत्या. मात्र त्या मशिनला अनेक तांत्रिक समस्या येत होत्या, त्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी प्रचंड त्रासाला समोरे जावे लागत होते. वेळोवेळी सर्वर डाऊन, लाभार्थी चे आंगठे न येणे व कव्हरेज ची समस्या अश्या अनेक समस्यामुळे दुकानदार व लाभार्थी हतबल होत. ही समस्या लक्षात घेता आता शासनाने 4G मशिनचे वाटप करण्याचे ठरविले त्याअनुषंगाने राजुरा तालुक्यात तहसीलदार मा. ओमप्रकाश गौड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी सौ. सविता गंभीरे, तालुका पुरवठा अधिकारी श्री वाकडे, श्री कांबळे यांच्या उपस्थितीत ईंटेग्रा मायक्रो सिस्टमचे जिल्हा समन्वयक श्मनोज सेंगर व तालुका टेक्नेशियन नितीन भोंगळे यांनी राजुरा तालुक्यातील 108 स्वस्त धान्य दुकानदारना 4G पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. आतातरी धान्य वाटपात गती व सुसूत्रता निर्माण होईल व लाभार्थ्यांच्या किमती वेळ वाचेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #wirurstation #tahasilofficerajura #4Gpossmachine #Cheapgrainstore #TalukaSupplyOfficer
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.