परिसरातून शेकडो ट्रकांची वर्दड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ जुन २०२४) -
राजुरा तालुक्यातील चनाखा-विहीरगांव रोडवर जंगलाला लागून मोठा तलाव आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या तलावावर जंगलातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी येतात. परंतू तलाव खोलीकरणाच्या नावावर मागील काही दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र उत्खनन सुरू असून मातीची वाहतुक केली जात आहे. त्यामुळे परिसरात ध्वनी व धुळ प्रदुषणामुळे प्राण्यांनी याठिकाणी पाणी पिण्यास येणे बंद केले असून पाण्याअभावी व होणाऱ्या प्रदुषणामुळे वन्यप्राण्यांचा जिव धोक्यात आला आहे.
राजुरा तालुका हा जंगल व्याप्त असून चनाखा विहीरगांव रोडवर निसर्गरम्य जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे वण्यजीव वास्तव्यास आहे. त्यात हरीण, राणडुक्कर, निलगाय, ससा, रोही, अस्वल, वाघ, बिबट सह अनेक प्राण्यांचा वावर आहे. या रस्त्यावर जंगलाला लागून असलेल्या मोठ्या तलावावर हे सर्व वण्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. याठिकाणी वाघाचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा पगमार्क वरून दिसून येते. वाघ व अन्य वन्यप्राणी रस्ता ओलांडतांना नागरिकांना बऱ्याचदा दिसतात. त्यामुळे वन विभागाने हा परिसर वण्यप्राणी कॅरीडोअर घोषीत करून या परिसरातून वाहने हळू चालविण्याची विनंती करणारे मोठ-मोठे फलक सुद्धा लावलेले आहे. मात्र मागील काही दिवसापासून वण्यप्राणी कॅरीडोअर परिसरातील तलावाच्या खोलीकरणाच्या नावावर दिवस-रात्र उत्खनन केले जात आहे. जी.आर. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी द्वारा बामणी-आसिफाबाद या महामार्गाच्या कामाकरीता दिवस भरात 200-300 ट्रक मातीचे उत्खनन करून वाहतुक केली जात आहे. त्यामुळे या परिसरात धुळीचे लोंढे पसरले आहे. तर मोठ-मोठ्या मशनरी व ट्रकांच्या अवा-गमनामुळे ध्वनी प्रदुषणही होत आहे. यामुळे येथे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांनी पाठ फिरविली आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने या वन्य प्राण्यांच्या हक्काचे पाणी पिण्यापासून त्यांना रोखण्यात येते असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणीही केली जात आहे. तलावाच्या खोलीकरणामुळे परीसरात पाण्याच्या पातळीत नक्कीच वाढ होणार आहे. परंतु या खोलीकरणामुळे वन्यजीवांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. व माती वाहतूकीमुळे रस्त्याची होणारी दयनावस्था थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
तलावाचे खोलीकरण करून येथील माती महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. याठिकाणी मुरूम युक्त माती असल्याने खोल खड्डा खणून मातीची ऊचल केली जात आहे. त्यामुळे वन्यजीवांना त्रास होत आहे. हक्काचे पाणी असूनही वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे दुर्दैव आहे. यावर वेळीच आळा घालावा.अभिजीत कोंडावार, निसर्गप्रेमी, राजुरा
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #Chanakha #Vihirgaon #area #WildlifeCorridor #Lakedeepening #Excavationdayandnight #summer #Noiseanddustpollution #Livesofwildanimalsareindanger #ForestDepartment #Soilusedforhighwayconstruction
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.