Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुसऱ्या दिवशीही CMPL कंपनी विरोधात आंदोलन सुरूच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 12 जून 2024) -         CMPL माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 12 जून 2024) -
        CMPL माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती येथेच सुरु आहे.

        कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार आहे. स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे. ह्या मागणीकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर 10 जून 2024 सोमवार पासून बेमुदत धरणे आंदोलना सुरु आहे.

        बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे, माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथुन कांबळे, राहुल राठोड, विशाल सल्लम, संकेत भादिकर, शंकर काळे, प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार यांचा समावेश आहे. 

आंदोलनाचा दुसरा दिवस
11 जून 2024 रोजी आमच्या न्याय हक्कासाठी व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यानी स्वतःच्या रक्ताने देशाचे पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहिले आहे. पत्राचा मचकुर "मां. मोदीजी आम्हाला न्याय द्या" असा आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #sasti #wclballarpurarea #CMPLCompany #wcloverburdan #coalmines #Anaishavahanchalakkamgarsanghatna #bhushanfuse #surajupare

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top