महिलांची पाण्याकरिता विहिरीवर रांग
वीज विना दळण चक्की बंद असल्याने गावकरी भातावरच
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २२ जून २०२४) -
महाराष्ट्र राज्यातील जिवती तालुका अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. जिवती तालुक्यात सुमारे ८२ गावे आहेत. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही हा तालुका मूलभूत सुविधेपासून दूर असून या परिसरात आल्यावर आपण जवळपास वीस वर्षे मागे आलो असं अनेकजणांना वाटते. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणारा या परिसरात निवडणुकीचा वेळेस नेते मूलभूत सोयीसुविधांची लॉलीपॉप देत असतात मात्र निवडणूक झाल्यावर पुन्हा निवडणुकीच्या एक वर्षांआधीपासून या परिसरात पुन्हा सोयीसुविधांची लॉलीपॉप देण्यासाठी येरझऱ्या मारत असतात. येथे बाहेरून नोकरीकरिता आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने लोकांची हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे मुख्यालय असलेल्या राजुरा शहरात १० मिनिटांकरिता वीज गेली तर येथील नागरिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरतात परंतु जिवती तालुक्यातील टाटाकोहोड गावात २ जून पासून डीपी जळाल्याने वीजपुरवठा खंडित झालेला असून याकडे कुणाचेही लक्ष नाही.
गावकऱ्यांनी महावितरणला वारंवार सूचना देऊनही वीस दिवस ओलटूनही वीज पुरवठा खंडित नसल्याने येथील रहिवाश्यांत प्रशासनाप्रती प्रचंड चीड निर्माण झाली आहे. एका महिन्याच्या थकीत वीज बिलाकरिता वीज पुरवठा खंडित करणारे महावितरण २० दिवसाचे मीटरभाडे, इंधन अधिभार, कर, व्हॅट हे सोडतील का असा प्रश्नही निर्माण झाला आहे? २० दिवसापासून गावात वीज नसल्याने वयोवृद्ध नागरिक, लहान मुलं यांचे हाल बेहाल होत आहे. वीजपुरवठाच नसल्याने गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्यासाठी महिलांना भर उन्हात विहिरीतून पाणी खेचून भरावे लागत आहे. वीजपुरवठाच नसल्याने दळण चक्की बंद असल्याने गावकऱ्यांना पोळीविनाच फक्त भातावरच निर्वाह करावे लागत आहे. वीजपुरवठा नसल्याने चार्जिंगविना गावकऱ्यांचे मोबाईल फोनही शोभेची वस्तू बनले आहे.
नुकतीच आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यात अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील गावकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा याकरिता आढावा बैठक घेतली होती, मात्र तरीही येथे कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी लोकप्रतिनिचीचा सूचनेला केराची टोपली दाखवत असेल तर गावकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, २० दिवसापासून वीजच नसल्याने मीटरभाडे, इंधन अधिभार, कर, व्हॅट हे उगीच कोण भरतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #jiwati #powersupplyinterrupted #tatakohod #RajuraAssemblyConstituency #Alollipopofbasicamenities #Drawwaterfromthewellandfillit #distribution #Grindingmillclosedduetolackofelectricitysupply #Mobilephoneswitchedoffduetolackofpowersupply #govtofficer #govtemployee
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.