Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 30 जून रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व व्याख्यान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महोत्सवाचा उपक्रम आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. २२ जून २०२४) -         यंदाचे वर्ष पुण्यश्लोक अहिल्या...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महोत्सवाचा उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २२ जून २०२४) -
        यंदाचे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे असून, त्यानिमित्त जिल्ह्यात वार्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक  उपक्रम म्हणून येत्या रविवारी, 30 जून रोजी दुपारी 2 वाजता येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात 10 व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे राहतील. तर प्रमुख अतिथी तथा वक्ता म्हणून नागपूर येथील प्रियदर्शिनी इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. गजेंद्र आसुटकर यांची उपस्थिती राहणार आहे.

        10 व 12 मध्ये 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार होणार आहे. अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका येत्या 25 जूनपर्यंत डॉ. गुलवाडे हॉस्पीटल, रामाळा तलाव रोड, चंद्रपूर येथे जमा करायची आहे. अधिक माहितीसाठी आशिष चोपडे (भ्रमणध्वनी क्रमांक 9923197473) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीतर्फे करण्यात आले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #Collector #CollectorVinayGowda #PunyashlokAhilyadeviHolkarTricentenaryJubileeFestival #mangeshgulwade #drmangeshgulwade

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top