Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: घोरपडी सह एक आरोपी अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धाबा वन विभागाची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा गोंडपिपरी (दि. २५ जून २०२४) -         शेत शिवारात असलेल्या घोरपडीला पकडून कापण्याचे उद्देशा...

धाबा वन विभागाची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गोंडपिपरी (दि. २५ जून २०२४) -
        शेत शिवारात असलेल्या घोरपडीला पकडून कापण्याचे उद्देशाने आणत असताना वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीस अटक केली आहे. मध्य चांदा वन विभागाचे धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोंडपिपरी उपक्षेत्राचे नियत वन क्षेत्र सुकवासी येथील शेतशिवारात घोरपड हे वन्यजीव पाऊस पडल्यानंतर उन्हात बाहेर पडली. यावेळी शेतात असणारे रमेश रामटेके राहणार धामणगाव याच्या नजरेत ती घोरपड दिसली, ती घोरपड कापून खाण्याचे उद्देशाने पकडली व घरी आणली. मात्र याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात आरोपीचे घरी धाड टाकली असता त्याचे घरी जिवंत घोरपड आढळून आली.  मोका पंचनामा करून मुख्य आरोपी रमेश रामटेके यास घोरपडी सह ताब्यात घेण्यात आले. आरोपीला उपक्षेत्र कार्यालय गोंडपिपरी येथे आणून वरिष्ठ अधिकाऱ्याचे सूचनेनुसार अटक करण्यात आली आणि पुढील कारवाई सुरू आहे. 

        सदर कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक राजेंद्र लडके, वनरक्षक जयदेव दत्ता, अनिल चुदरी, वनमजुर नाजूक निकोडे, दिलीप देव्हाडे, नामदेव घुबडे यांनी केली पुढील तपास सुरू आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #gondpipari #ForestDepartment #dhabha #DestinedForestAreaofGondpiparisub-region #ConservatoroForests #ForestRangeOfficer

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top