आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा - (दि. २६ जून २०२४) -
सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, लोकराजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आज स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी उपस्थितांसह छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, त्यांच्या विचारांचा, कार्याचा कृतिशील वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी सक्षमपणे केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक राज्यकर्त्यासाठी, सरकारसाठी मार्गदर्शक आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकोत्तर राजे होते. लोकांनी त्यांच्या कामासाठी सरकारच्या दारात येण्याची गरज नाही, सरकारच लोकांच्या दारात जाईल, हा विचार शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अंमलात आणला. त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना कृतीत उतरवून त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी आपण सर्वांनी आज संकल्प केला पाहिजे, अशी भावना याठिकाणी बोलताना देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.
यावेळी, रमेश राऊत, बाबुराव भगत, प्रकाश मडावी, प्रकाश ढेंगरे, महेंद्र मोरे, यशवंत उलमाले, बाळकृष्ण वाघाडे, तुकाराम मामीडवार, देवराव सातपुते यांची त्यांसमवेत उपस्थिती होती.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #RajarshiShahuMaharaja #ShahuMaharajJayanti #SudhirBhauMungantiwarsevakendra #DevraoBhongle #BJPPublicRelationsOffice
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.