आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ जून २०२४) -
जिल्ह्यात सुर्य आग ओकत आहे, जिवाची लाही लाही होत आहे. अशातच एक महिला बामणी-राजुरा रस्त्यावर उष्माघाताने निपचित पडली होती. तीचे दोन्ही मुले जिवाच्या आकांताने तीला मदत करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत होते. अशातच राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकरांना ही परिस्थिती दिसताच त्यांनी थांबून विचारपूस करीत त्या महिलेला आपल्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने तीचे प्राण वाचले व निमकर तीच्यासाठी देवदुतच ठरले.
सध्या जिल्ह्याचे तापमाण बघता कुणालाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. मानिकगड सिमेंट कंपनीच्या माईन परिसरात राहणारी महिला आपल्या दोन मुलांसह दुचाकी वाहनाने कोठारी येथे लग्नसमारंभाकरीता गेले होते. लग्नसमारंभ आटोपून परतीच्या प्रवासात तप्त उन्हामुळे राजुरा-बामणी रस्त्यावर तीला अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. तीच्या दोन्ही मुलांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून जिवाच्या आकांताने तीला पाणी पाजून, वारा घालून मदत करण्याचा केवीलयाना प्रयत्न करीत होते. परंतू ती काही प्रतिसाद देत नव्हती.
अशातच या रस्त्यावरून राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर सुद्धा राजुरा कडे येत होते. त्यांना हे दृष्य दिसताच त्यांनी आपली गाडी थांबवून विचारपूस करीत त्या महिलेला आपल्या वाहणाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तीच्यावर वेळीच उपचार केले व तीचे प्राण वाचले. समाजसेवत तत्पर असलेल्या सुदर्शन निमकरांचे त्या महिलेने व तीचा मुलांनी आभार मानले. त्या महिलेसाठी सुदर्शन निमकर हे देवदुत्तच ठरले असे म्हणने वावगे ठरणार नाही.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #sudarshannimakr #RajuraBamaniRoad #lagnasamarambha #UpazilaHospital #heatvave #heat #stroke #Accident
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.