Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणीच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि.१० मे २०२४) -         कोरपना तालुक्...

तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि.१० मे २०२४) -
        कोरपना तालुक्यातील मौजा जेवरा आणि लोणी परिसरात दि. ६ मे २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, घरांना, भिंतींना भेगा पडल्या, झाडे उन्मळून पडले, वीजखांब कोसळल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. यात जेवरा गावात जवळपास ७५ घरांचे तर लोणी येथे जवळपास २५ ते ३० घरांचे नुकसान झाल्याची तर २ नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार सुभाष धोटे यांनी या परिसरात दौरा करून जेवरा, लोणी परिसरातील नागरिकांच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले तसेच घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून नुकसानग्रस्तांना भरीव शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली असल्याची माहिती आ. धोटे यांनी ग्रामस्थांना दिली. 

      यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, ज्येष्ठ नेते सुरेशराव मालेकर, माजी संचालक भाऊराव चव्हाण, जेवरा येथील रसूल पाटील, अनिल गोंडे, सुधाकर भोयर, विठोबा गेडाम, लोणी येथील घनश्याम नांदेकर, ज्ञानेश्वर आवारी, देवराव सोनटक्के, मुसळे जी, डॉ. पिंपळशेंडे, सिद्धार्थ सातपुते, गजानन काकडे यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

#aamchavidarbha
#vidarbha
#chandrapur #korpana
#subhashdhote #jevara #loni
#Rain-fellwith-gale-forcewinds

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top