Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: १३ मे ला ॲड. वामनराव चटप अभिष्टचिंतन सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान आमचा विदर्भ दीपक शर्मा राजुरा (दिनांक 12 मे 2024) -              ॲड.वामनराव चटप मित्रमंडळ च...


जेष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान

आमचा विदर्भ दीपक शर्मा

राजुरा (दिनांक 12 मे 2024) -

             ॲड.वामनराव चटप मित्रमंडळ चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जीवती व गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ मे २०२४, रोज सोमवारला दुपारी एक वाजता राजुरा येथील उद्धव मंगल कार्यालयात माजी आमदार आणि ज्येष्ठ शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

                या सोहळ्याला ॲड. चटप यांचे गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला ॲड. दिनेश शर्मा यांचेसह अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. वामनराव चटप मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

#aamchavidarbha #vidarbha

#advwamanraochatap #birthday

#mitramandal

#sureshdwadashiwar #seniorjurnalist

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top