Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन हायअलर्ट वर आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ०२ एप्रिल २०२४)         लोकसभा निवडणुकीच्या पार...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन हायअलर्ट वर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०२ एप्रिल २०२४)
        लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. 

        अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनीनी आदेश पारीत करताच शुभम अमर समूद (वय 26), रा. पंचशील वॉर्ड चंद्रपूर, शाहरुख नुरखा पठाण (वय 29), रा. अष्टभुजा वॉर्ड, जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा (वय 31), रा. लुंबिनी नगर, बाबुपेठ वॉर्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर (वय 25), रा. चिचघर ले-आऊट वरोरा, दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग (वय 22), रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, मुनीर खान वहिद खान पठाण (वय 55), रा. शिवनगर नागभीड, शिवशाम उर्फ भिस्सु दामोदर भुर्रे (वय 25), रा. हनुमान नगर, ब्रम्हपूरी यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये सहा महिन्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

        तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण 13 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापुजी उरकुडे (वय 45), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, प्रताप रमेश सिंग (वय 26), रा. अमराई वॉर्ड घुग्घुस, श्यामबाबू चंद्रपाल यादव (वय 29)  रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर, राजेश मुन्ना सरकार (वय 47), रा. इंडस्ट्रीय वॉर्ड, बंगाली कॅम्प चंद्रपूर, संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने  (वय 30), रा. सिस्टर कॉलनी चंद्रपूर, अरबाज जावेद कुरेशी (वय 26), रा. हवेली गॉर्डन चंद्रपूर यांना कलम 56 (1)(अ)(ब)  मपोका अन्वये 6 महिने व 1 वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. 

      सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम (वरोरा), सुधाकर यादव (चंद्रपूर), दीपक साखरे (राजुरा), दिनकर ठोसरे (ब्रम्हपूरी), तसेच उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे (वरोरा), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा), संदीप भस्के (ब्रम्हपूरी) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक आसिफराजा (बल्लारपूर), अनिल जिट्टावार  (ब्रम्हपूरी), विजय राठोड (नागभीड), सुनील गाडे (रामनगर, चंद्रपूर) आणि श्याम सोनटक्के (घुग्घुस) यांच्यावतीने करण्यात आली आहे. (aamcha vidarbha) (chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top