Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माथरा येथे गुणवंताचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०२ एप्रिल २०२४)         माथरा येथील सचिन भाऊजी मडावी यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सा...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०२ एप्रिल २०२४)
        माथरा येथील सचिन भाऊजी मडावी यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अँड. मारोती कुरवटकर व सहकऱ्यांच्या वतीने त्यांचा नुकताच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        माथरा येथील रहिवासी असलेले सचिन भाऊजी मडावी यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गव्हाली, जि. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सचिन भाऊजी मडावी हे आदीवासी समाजातील असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशा हलाखीच्या परिस्थितीतही सचिन भाऊजी मडावी यांनी शिक्षण घेउन पदवीधर शिक्षक या पदापर्यंत मजल गाठली. त्याबद्दल त्यांचा त्यांच्या घरी जाउन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (Khamona gram panchayat Former sarpanch Lahu Chahare)

        या सत्कार सोहळ्याप्रसंगी टेंबुरवाही ग्रा.पं. चे सरपंच रामकृष्ण मडावी, खामोना ग्रा.पं. चे माजी सरपंच लहु चहारे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमसागर राउत, महादेव ताजणे, हरीशचंद्र चहारे, अनिल डाखरे, राहुल क्षिरसागार, श्रीधर वैद्य आणि गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top