Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजुरा महिला कार्यकारणी गठित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहर अध्यक्ष पदी सौ.भावना शेंडे तर शहर उपाध्यक्ष पदी सौ. अनुराधा मेश्राम आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १४ मार्च २०२४) -         राजुरा...

शहर अध्यक्ष पदी सौ.भावना शेंडे तर शहर उपाध्यक्ष पदी सौ. अनुराधा मेश्राम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ मार्च २०२४) -
        राजुरा तालुका व शहराची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक मनसे जिलाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विश्राम गृह येथे पार पडली. बैठकीत तालुकाध्यक्ष आदित्य भाके (aaditya bhake) यांच्या उपस्थितीत राजुरा शहर कार्यकारणी गठित करण्यात आली. शहराध्यक्ष पदी सौ. भावना शेंडे व शहर उपाध्यक्ष पदी सौ. अनुराधा मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली तसेच या बैठकीत अनेक महिलांना व मुलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी राजुरा शहराध्यक्ष कित्तू मेडपल्लीवर, सहील चौधरी व अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura) (maharashtra navnirman sena)



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top